SBI बँकेत लिपिक पदांच्या 5180 जागांसाठी भरती सुरू ! पदवी पास तरुणांसाठी खुशखबर

SBI Clerk Recruitment 2025 : बँकिंग क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एसबीआय (SBI) बँकेकडून नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या भारतातील नामांकित व मोठ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या बँकेत 5180+ रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

📢 पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) कस्टमर सपोर्ट & सेल्स

🎱 एकूण पदसंख्या : 5180 जागा

पद क्रमांकपदनामपदसंख्या
01ज्युनियर असोसिएट (लिपिक) कस्टमर सपोर्ट & सेल्स5180+ जागा

📚 शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2025 रोजी 20 ते 28 वर्षे असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

💵 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/EWS – ₹750/- ( SC/ST/PWD/ExSM – फी नाही )

💰 पगार/वेतनश्रेणी : रु 24,050 ते 64,480 रु दरमहा

📣 निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड प्रक्रिया 2 टप्प्यात घेण्यात येईल. ज्यामध्ये ऑनलाईन चाचणी अंतर्गत प्रारंभिक व मुख्य परीक्षा तसेच विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असेल.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2025

मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2025

📆 अर्जासाठी शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2025

भरतीची PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For SBI Clerk Recruitment 2025

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. ही अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेत अर्ज करा.
  • ऑनलाईन अर्ज करताना दिलेल्या माहितीसाठी आधारभूत मूळ कागदपत्रे भरती प्रक्रियेत लागतील, त्यामुळे ती अचूक व तयार ठेवा.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी JPG/JPEG फॉरमॅटमध्ये, दिलेल्या साईज मर्यादेत अपलोड करणे आवश्यक असेल.
  • अर्ज शुल्क भरत असताना इंटरनेट कनेक्शन आणि व्यवहार सुरक्षिततेची खात्री करून घ्या; कारण एकदा भरलेली फी परत मिळत नाही.
  • संबंधित भरतीबद्दल अधिक माहितीसाठी वरील रखना देण्यात आलेली Pdf जाहिरात सविस्तर वाचा.

Leave a Comment