Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिकेत गट क अंतर्गत येणार्या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू झालेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल/रोखपाल, सिस्टीम अनालिस्ट, हार्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर, प्रोग्रामर
🎱 एकूण पदसंख्या : 174 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : सर्व पदांची शैक्षणिक पात्रता सविस्तर खालीलप्रमाणे देण्यात आली आहे .
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| कनिष्ठ लिपिक | 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी 2) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र |
| विधी सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी आणि शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील ५ वर्षे वकीलीचा अनुभव |
| कर संग्राहक | कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्या प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र |
| ग्रंथालय सहाय्यक | 1) 10वी उत्तीर्ण 2) ग्रंथालयाचा सर्टीफिकेट कोर्स |
| स्टेनोग्राफर | 1) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी 2) मराठी व इंग्रजी लघुलेखक ८० श.प्र.मि परिक्षा उत्तीर्ण. 3) मराठी ४० व इंग्रजी ६० श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण. स्टोनोटायपिस्ट पदाचा 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
| लेखापाल/रोखपाल | मान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेची पदवी. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेट (डी.एफ.एम) पदविका उत्तीर्ण अथवा L.G.S.D किंवा G.D.C & A परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य |
| सिस्टीम अनालिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) अर्हता आणि सिस्टीम अॅनॉलिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव |
| हार्डवेअर इंजिनियर | मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकी मधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाची Computer Hardware मधील पदविका आणि 5 वर्षाचा अनुभव |
| डेटा मॅनेजर | मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma) अर्हता आणि ब) सिस्टीम अॅनलिसिस/प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील १ वर्षाचा अनुभव क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल |
| प्रोग्रामर | मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्रापत पदवी (B.E Computer) अर्हता आणि सिस्टीम अॅनालिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल |
💁🏻♂️ वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच वय 9 सप्टेंबर 2025 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.
💵 अर्जासाठी फीस : अनारक्षित प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 1000/- असेल, तर आरक्षित प्रवर्गासाठी ( माजी सैनिकांव्यतिरिक्त) रु. 900/- असेल. माजी सैनिकांना शुल्क माफ आहे.
💰 पगार/वेतनश्रेणी : विविध पदांची पगार खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
| कनिष्ठ लिपिक | 19,900 ते 63,200 |
| विधी सहाय्यक | 38,600 ते 1,22,800 |
| कर संग्राहक | 19,900 ते 63,200 |
| ग्रंथालय सहाय्यक | 19,900 ते 63,200 |
| स्टेनोग्राफर | 38,600 ते 1,22,800 |
| लेखापाल/रोखपाल | 35,400 ते 1,12,400 |
| सिस्टीम अनालिस्ट | 38,600 ते 1,22,800 |
| हार्डवेअर इंजिनियर | 38,600 ते 1,22,800 |
| डेटा मॅनेजर | 38,600 ते 1,22,800 |
| प्रोग्रामर | 25,500 ते 81,100 |
✈️ नौकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2025
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
- महानगरपालिकेच्या या भरतीसाठी उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी, त्यानंतरच आरोग्य करावा.
- अर्ज करत असताना जाहिरातीत देण्यात आल्याप्रमाणे उमेदवारांची मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी.
- जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये फोटो, सही व इतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2025 देण्यात आली आहे.
- संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.