GMC Mumbai Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्यामार्फत 10वी पास उमेदवारांना गट-ड (वर्ग 4) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी अधिकृत भरतीची जाहिरात निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2025 (11:55 PM) देण्यात आलेली असून या विहित मुदतीत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
📢 पदाचे नाव : गट-ड (वर्ग 4) अंतर्गत येणारी विविध पदे उदा. शिपाई, शवविच्छेदन परिचर, प्रयोगशाळा परिचर, सुरक्षारक्षक, बाह्य रुग्णसेवक इत्यादी
🎱 एकूण पदसंख्या : 211 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : GMC मुंबई अंतर्गत येणार्या गट-ड पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कमीत कमी 10वी पास असावा.
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 26 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष असाव.(मागासवर्गीय/खेळाडू – 05 वर्षे सूट)
💵 परीक्षा फीस : खुला प्रवर्ग – 1000/- रु राखीव प्रवर्ग – 900/- रु
💰 पगार/वेतनश्रेणी : वेतनश्रेणी नियमानुसार देय असेल.
✈️ नोकरी ठिकाण : मुंबई
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2025
⌛ परीक्षा दिनांक : यासंदर्भातील माहिती उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For GMC Mumbai Bharti 2025
- वरील नमूद गट-ड अंतर्गत येणाऱ्या विविध पदासाठी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- ऑनलाइन अर्ज करत असताना मूलभूत माहिती शैक्षणिक माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी योग्य त्या फॉरमॅट व आकारात अपलोड करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीत आपला अर्ज सादर करावा.
- या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी.