गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू ! शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 ही संधी सोडू नका

Goa Shipyard Bharti : गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी व जुनियर प्रोजेक्ट एक्झिक्यूटिव्ह या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखात्यारीत असलेली एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीमार्फत जहाज बांधणी, जहाजांची दुरुस्त आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात विविध कार्य केली जातात. भारत सरकारच्या या नामवंत कंपनीत नोकरीची संधी निघालेली असून ही संधी सोडू नका !

ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.

📢 पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह

🎱 एकूण पदसंख्या : 65 जागा

जा.क्रपदाचे नावरिक्त जागा
06/2025मॅनेजमेंट ट्रेनी32
07/2025ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह30

📚 शैक्षणिक पात्रता : दोन्ही पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आलेली आहे.👇

पदनाम शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Electrical/Electronics/Naval Architecture/ Robotics) किंवा CA/ICMA
प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह(1) B.E/B.Tech./B.Sc (Mechanical/Electrical/Electronics/Civil) (2) 03 वर्षे अनुभव

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 जुलै 2025 रोजी 18 ते 32 वर्ष असावं. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

💵 परीक्षा फीस : General/OBC/EWS – रु 500/- (SC/ST/PWD/ExSM – फी नाही)

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📆 शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2025

परीक्षा तारीख : यासंदर्भातील माहिती उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल किंवा ई-मेल आयडीवरती पाठविण्यात येईल.

PDF जाहिरात 1येथे क्लिक करा
PDF जाहिरात 2येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Goa Shipyard Bharti 2024

  • वरील नमूद विविध पदांसाठी उमेदवारांना गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करताना मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव इत्यादी संपूर्ण काळजीपूर्वक पडताळणी करूनच अर्ज दाखल करावा.
  • जाहिरातीत देण्यात आल्याप्रमाणे सर्व कागदपत्र, फोटो, सही इत्यादी योग्य आकारात आणि Format मध्ये अपलोड करावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 आहे.
  • संबंधित भरतीबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील रकान्यात देण्यात आलेली PDF डाऊनलोड करून सविस्तर वाचावी.

Leave a Comment