पंजाब & सिंध बँकेत पदवी पास उमेदवारांना नौकरीची चांगली संधी उपलब्ध ! पगार तब्बल 93,960 रुपये दरमहा मिळणार

Punjab & Sind Bank Recruitment 2025 : तुम्ही, तुमचा मित्र किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती पदवीधर असेल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर पंजाब & सिंध या नामांकित बँकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

क्रेडिट मॅनेजर (MMGS II) व एग्रीकल्चर मॅनेजर (MMGS II) या दोन्ही पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 देण्यात आलेली आहे.

📢 पदाचे नाव : क्रेडिट मॅनेजर (MMGS II), एग्रीकल्चर मॅनेजर (MMGS II)

🎱 एकूण जागा : 190 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : क्रेडिट मॅनेजर व एग्रीकल्चर मॅनेजर या दोन्ही पदासाठीची सविस्तर शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पद क्र.1 : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (SC/ST/OBC/PWD – 55% गुण) किंवा CA/CMA/CFA/ MBA(Finance) + 03 वर्षे अनुभव

पद क्र.2 : 60% गुणांसह शेती/फलोत्पादन/दुग्धव्यवसाय/पशुसंवर्धन/वनीकरण/ पशुवैद्यकीय विज्ञान/कृषी अभियांत्रिकी पदवी (SC/ST/OBC/PWD – 55% गुण) + 03 वर्षे अनुभव

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवारांची वयोमर्यादा किमान 23 वर्ष आणि कमाल 35 वर्षे असावी. अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) याना 5 वर्ष सवलत, OBC (नॉन-क्रमिलेयर) 3 वर्ष सवलत, दिव्यांगाना 10 वर्ष सवलत

💵 अर्जासाठी शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु 850/- (SC/ST/PWD : रु 100/-)

💰 पगार/वेतनश्रेणी : 64,820/-2340/1-67160-2680/10-93,960/-

✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

📍 निवड पद्धत : निवड प्रामुख्याने 3 टप्यात होईल – लेखी परीक्षा, चाचणी, वैयक्तिक मुलाखत आणि अंतिम गुणवत्ता यादी

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📆 शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2025

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतर बँक भरतीसाठीयेथे क्लिक करा

How To Apply For Punjab & Sind Bank Recruitment 2025

  • पंजाब & सिंध बँकेच्या या भरतीकरिता बँकेकडून देण्यात आलेली ऑनलाईन अर्जाची लिंक वरील रखान्यात देण्यात आलेली आहे.
  • त्या वेबसाईटवर जाऊन Click Here For New Registration या पर्यायावर तुमच रजिस्ट्रेशन करून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या मूलभूत व शैक्षणिक माहितीसह काळजीपूर्वक अर्ज भरा.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली आवश्यक ती कागदपत्रे, सही व फोटो अपलोड करा.
  • अर्जामध्ये भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या, त्यानंतर अर्जाचा शुल्क भरा.
  • अर्जाचा शुल्क भरल्यानंतर, संपूर्ण अर्जाची प्रिंट आऊट काढून जतन करून ठेवा.
  • वरील भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात सविस्तर वाचून पहा.

Leave a Comment