Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 : मित्रांनो, तुमचा किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा डिप्लोमा अथवा ITI Surveyor झाला असेल, तर तुमच्यासाठी भूमी अभिलेख विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भूमी अभिलेख विभागाकडून भुकरमापक या पदासाठी नुकतीच नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर देण्यात आली आहे. या विहित मुदतीतच उमेदवारांनी अर्ज करावा, त्यानंतर अर्जाची लिंक बंद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
📢 पदाचे नाव : भुकरमापक
🎱 एकूण पदसंख्या : 903 जागा
| विभाग/प्रदेश | रिक्त जागा |
|---|---|
| पुणे प्रदेश | 83 |
| कोकण प्रदेश, कोकण | 259 |
| नाशिक प्रदेश | 124 |
| छ.संभाजीनगर प्रदेश | 210 |
| अमरावती प्रदेश | 117 |
| नागपूर प्रदेश | 110 |
📚 शैक्षणिक पात्रता : (1) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)
💵 अर्जासाठी शुल्क : अमागास प्रवर्ग – रु 1000/- (मागास प्रवर्ग – रु 900/-)
💰 पगार/वेतनश्रेणी : रु 19900/- ते 63200/-
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025
| संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025
- भूमी अभिलेख विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागेल.
- ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी आपली मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्ज भरताना सर्व कागदपत्र, सही आणि फोटो योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 देण्यात आलेली आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.