नागपूर महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू ! त्वरित अर्ज करा, ही आहे शेवटची तारीख ?

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिकेत गट क अंतर्गत येणार्‍या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू झालेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.

📢 पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, कर संग्राहक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल/रोखपाल, सिस्टीम अनालिस्ट, हार्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर, प्रोग्रामर

🎱 एकूण पदसंख्या : 174 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : सर्व पदांची शैक्षणिक पात्रता सविस्तर खालीलप्रमाणे देण्यात आली आहे .

पदनामशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी 2) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र
विधी सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी आणि शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील ५ वर्षे वकीलीचा अनुभव
कर संग्राहककोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्या प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र
ग्रंथालय सहाय्यक1) 10वी उत्तीर्ण 2) ग्रंथालयाचा सर्टीफिकेट कोर्स
स्टेनोग्राफर1) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी 2) मराठी व इंग्रजी लघुलेखक ८० श.प्र.मि परिक्षा उत्तीर्ण. 3) मराठी ४० व इंग्रजी ६० श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण. स्टोनोटायपिस्ट पदाचा 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
लेखापाल/रोखपालमान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेची पदवी. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेट (डी.एफ.एम) पदविका उत्तीर्ण अथवा L.G.S.D किंवा G.D.C & A परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
सिस्टीम अनालिस्टमान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) अर्हता आणि सिस्टीम अॅनॉलिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव
हार्डवेअर इंजिनियरमान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकी मधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाची Computer Hardware मधील पदविका आणि 5 वर्षाचा अनुभव
डेटा मॅनेजरमान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma) अर्हता आणि ब) सिस्टीम अॅनलिसिस/प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील १ वर्षाचा अनुभव क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल
प्रोग्रामरमान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्रापत पदवी (B.E Computer) अर्हता आणि सिस्टीम अॅनालिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच वय 9 सप्टेंबर 2025 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.

💵 अर्जासाठी फीस : अनारक्षित प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 1000/- असेल, तर आरक्षित प्रवर्गासाठी ( माजी सैनिकांव्यतिरिक्त) रु. 900/- असेल. माजी सैनिकांना शुल्क माफ आहे.

💰 पगार/वेतनश्रेणी : विविध पदांची पगार खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कनिष्ठ लिपिक19,900 ते 63,200
विधी सहाय्यक38,600 ते 1,22,800
कर संग्राहक19,900 ते 63,200
ग्रंथालय सहाय्यक19,900 ते 63,200
स्टेनोग्राफर 38,600 ते 1,22,800
लेखापाल/रोखपाल35,400 ते 1,12,400
सिस्टीम अनालिस्ट38,600 ते 1,22,800
हार्डवेअर इंजिनियर38,600 ते 1,22,800
डेटा मॅनेजर38,600 ते 1,22,800
प्रोग्रामर 25,500 ते 81,100

✈️ नौकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📆 शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2025

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

  • महानगरपालिकेच्या या भरतीसाठी उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी, त्यानंतरच आरोग्य करावा.
  • अर्ज करत असताना जाहिरातीत देण्यात आल्याप्रमाणे उमेदवारांची मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये फोटो, सही व इतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2025 देण्यात आली आहे.
  • संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

Leave a Comment