शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई या ठिकाणी दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! पगार तब्बल 47000 रुपये मिळणार

GMC Mumbai Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्यामार्फत 10वी पास उमेदवारांना गट-ड (वर्ग 4) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी अधिकृत भरतीची जाहिरात निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2025 (11:55 PM) देण्यात आलेली असून या विहित मुदतीत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

📢 पदाचे नाव : गट-ड (वर्ग 4) अंतर्गत येणारी विविध पदे उदा. शिपाई, शवविच्छेदन परिचर, प्रयोगशाळा परिचर, सुरक्षारक्षक, बाह्य रुग्णसेवक इत्यादी

🎱 एकूण पदसंख्या : 211 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : GMC मुंबई अंतर्गत येणार्‍या गट-ड पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कमीत कमी 10वी पास असावा.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 26 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष असाव.(मागासवर्गीय/खेळाडू – 05 वर्षे सूट)

💵 परीक्षा फीस : खुला प्रवर्ग – 1000/- रु राखीव प्रवर्ग – 900/- रु

💰 पगार/वेतनश्रेणी : वेतनश्रेणी नियमानुसार देय असेल.

✈️ नोकरी ठिकाण : मुंबई

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📆 शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2025

परीक्षा दिनांक : यासंदर्भातील माहिती उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For GMC Mumbai Bharti 2025

  • वरील नमूद गट-ड अंतर्गत येणाऱ्या विविध पदासाठी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना मूलभूत माहिती शैक्षणिक माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी योग्य त्या फॉरमॅट व आकारात अपलोड करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीत आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी.

Leave a Comment